अक्षरधारा

अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा

स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई महिला सक्षमीकरण विषय घेवून सन २००६ पासून कार्यरत आहेत.  संस्थेचे उमंग कला मंच हे व्यासपीठ कला, शिक्षण व अन्य विषयांवर काम करते. उमंग मंच द्वारे महिलांकरिता अक्षरधारा राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन होत असून त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

स्पर्धा केवळ महिलांकरिता खुली.
लेख पाठविण्याची तारीख: दिनांक २० जुलै, २०२० ते ३१ जुलै, २०२०.

लेख किमान ५००-७५० शब्दांचा असावा.

खालील विभागात लेख पाठविण्यात येवू शकतील :

१. शैक्षणिक क्षेत्र : महिलांची शिक्षण क्षेत्रातील प्रगती, बदल याविषयक
२. औद्योगिक क्रांती : महिलांचा औद्योगिक क्षेत्रातील सहभाग, कार्य
३. भटकंती : एखाद्या ठिकाणाला दिलेल्या भेटीचे, त्या ठिकाणाचे महत्त्व स्पष्ट करणारा लेख
४. क्रीडा : क्रीडा क्षेत्रातील महिलांचे योगदान, महिलांचे खेळ
५. साक्षरता : सर्वच स्तरांवरील महिलांची साक्षरता, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक
६. सण, सणांचे जीवनातील महत्त्व
७. आरोग्य
८. यशस्वी व्यक्तिरेखा
९. कथा : कथा प्रकारात मोडणारा कुठलाही प्रकार
१०. नात्यातील आठवणींचे भावनिक अनुभव कथन.

३ विजेत्यांना रोख पुरस्कार व प्रशस्तीपत्रक दिले जाईल
प्रथम पुरस्कार   : रु.२,५००/- + प्रशस्तीपत्र
द्वितीय पुरस्कार : रु.१,५००/- + प्रशस्तीपत्र
तृतीय पुरस्कार :  रु.१,०००/- + प्रशस्तीपत्र
इतर १० उत्तेजनपर पुरस्कार

विजेत्यांची नावे, फोटो लेख इत्यादी संस्थेच्या ई-प्रकाशनात प्रामुख्याने प्रकाशित केले जाईल.

अटी व नियम
१) लेख केवळ मराठी भाषेतच हवेत
२) लेखिका १८ वर्षावरील असावी
३) लेख खालील लिंक वरील अर्ज भरून अपलोड केलेले असावेत, इमेल किंवा पत्राने पाठविलेले नसावेत
४) लेख स्वयंरचित व टाईप केलेले .doc / .docx / .pdf  या स्वरूपातील असावेत
५) स्पर्धक एका पेक्षा अधिक विभागात सहभाग घेऊ शकते.
६) निबंधात जातपात / धर्म पंथ / राजकीय / देश विरोधी भाष्य नसावे
७) संस्थेच्या संपादकीय मंडळाचा निर्णय अंतिम व सर्वमान्य असेल
८) या स्पर्धेत पाठविलेले लेख संस्था आपल्या प्रकाशनात वापरू शकते, असे लेख वापरले गेल्यास त्या त्या लेखिकेचे नाव प्रकशित केले जाईल.
९) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
१०) स्पर्धेच्या विजेत्यांना व प्रोत्साहनपर जाहीर १० विजेत्यांना त्यांचे लेख वाचन करण्यासाठी संस्थे द्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.

स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा दिनांक १५ ऑगस्ट, २०२० रोजी केली जाईल

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *